Header Ads Widget

Responsive Advertisement

Ek Hoti Kshitija क्षितिजा : Marathi Prem Katha : kMr RAVI

क्षितिजा : प्रेमकथा व..मन आणि प्रेम.

गोष्टींतले प्रेम आणी प्रेमाच्या कथा
एक होती क्षितिजा ......
Ek Hoti Kshitija by Ravi Kavya Kshitija


कदाचित हि गोष्ट फारच जुनी आणि प्रत्येकाने
ऐकलेली असावी, पण
ज्या ज्या वेळी ती ऐकावी त्या त्या वेळेला मनाला चुटपूट लावून जाणारी....
असेच काहीस घडले क्षितिजाच्या आयुष्यातही, क्षितिजा खूप
हुशार , खूप बोलणारी, मन मिळावू आणि खुप सुंदर , तिचे हसणे
एवढे मोहक कि दु:खही पळून जाणारे, वडिलांच्या निधनानंतर
स्वतःला खुप मोठी समजायला लागली होती...
तिच्या चाणाक्ष बुद्धीची कदाचित कल्पनाही करता येणार नाही पण,
समोरच्या व्यक्तीच्या मनी काय आहे हे त्याला पाहताच,
ओळखणारी, घरच्या परिस्थितीने गांजलेली पण,
तरीही आकाशाला झेप घेणारी स्वप्ने
पाहणारी अशी ही क्षितिजा सर्वांनाच हवी हवी असणारी.....
क्षितिजा कॉलेज मध्ये असताना शांतच असायची त्यामुळे,
तिला कोणी तिचे कॉलेजचे मित्र मैत्रिणी जास्त ओळखत नव्हते,
पण कॉलेज संपल्यावर आणि तिच्या वडिलांच्या निधनानंतर
ती तिच्या कॉलेजच्या मित्र मैत्रिणीबरोबर फोन वर गप्पा मारू लागली होती कारण फोन वर बोलून ती स्वतःचा विरंगुळा करत
होती......
असेच एकदा सोशल नेटवर्किंग सायीट वरून तिची ओळख,
तिच्याच कॉलेज मधला मित्र रवि शी झाली, रवि खूप प्रेमळ,
खूप समजंस आणि खूप साधा, चांगुलपणाचा तो एक मूर्तिमंत
उदाहरण होता.....
कॉलेज मध्ये शांत असणारी क्षितिजा आता रवि शी फोन वर तासन
तास गप्पा मारत होती, ज्या ज्या वेळी त्यांना वेळ मिळे ,
त्या त्या वेळी ती दोघे फोन वर बोलत होते ,
त्यांच्या गप्पा एवढ्या रंगायच्या कि त्यांना वेळेचे आणि भुकेचे
भानही नसायचे.....
असेच एकदा  रवीने  क्षितिजाला मन आणि प्रेमाची गोष्ट सांगितली,
.
रवी तिला सांगतो.....
" मन आणि प्रेम हे दोघे जिवलग मित्र असतात
त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम असते,,एके दिवशी ती दोघे बागेत
खेळायला जातात आणि लपाछपी खेळायला सुरुवात करतात
लापाछपीच्या त्यांच्या खेळामध्ये राज्य प्रेमावर येते आणि मन
लपायला एक काटेरी झुडूप निवडते,, मन एका काटेरी झुडुपामागे
लपल्या मुळे प्रेमाला जास्त संशय येत नाही कारण त्याला असे
वाटते मन एवढी नाजूक आहे कि ती काटेरी झुडुपामागे लपुच शकत
नाही म्हणून प्रेम प्रत्येक काठेरी झुडुपाला काठीने मारत असतो ,,
प्रेम मनाला खूप शोधतो आणि शेवटी तो त्या काटेरी झुडुपामागे
येतो...
पाहतो तर काय त्याची मन विव्हळत होती ,, तिचे डोळे
रक्ताने माखलेले होते ,, प्रेम खूप घाबरतो.....
खूप
आरडा ओरडा करतो,, पण प्रेमाची मदत करायला कोणीच पुढे येत
नाही,, शेवटी प्रेम मनाला घेवून डॉक्टर कढे जातो.....
डोळ्यात काटे
गेल्याने मन आंधळी होते,, मनाचे डोळे जातात ,, म्हणून मग प्रेम
मनाला आपले डोळे देते आणि म्हणूनच प्रेम आंधळे असते
आणि त्यानंतर मन आणि प्रेम खूप सुखाने राहतात....
क्षितिजाला तशी हि गोष्ट नवीनच होती , तिने पहिल्यांदा ऐकली होती....
पण हि गोष्ट ऐकून भावूक  क्षितिजा स्तब्धच
झाली होती आणि ह्या गोष्टीनंतर ती रवि च्या केव्हा प्रेमात
पडली हे तिला देखील कळले नाही,, आता मात्र   क्षितिजाला फक्त
रविशीच बोलावेसे वाटत होते,, तसा रवि तिचा कॉलेज मित्र.....
 पण
तरीही त्या दोघांनीही एकमेकांना पाहिलेले नव्हते.....
 कदाचित
त्यांच्या रोजच्या फोनवरच्या बोलण्यामुळे
रविलाही  क्षितिजा आवडायला लागली होती ,,
असेच एके दिवशी  क्षितिजा ,
रविला आपल्या मनीच्या भावना फोनवरच व्यक्त करते तिला वाटले,
रवि हि तिच्यावर प्रेम करतोय पण रविने तिला नकार दिला पण,
तरीही रवि  क्षितिजाला  म्हणाला ,,
”मला तुला एकादा मिठीत घ्यायचय”,,
 दुसऱ्याच
दिवशी रविच्या मित्राची लग्नाची पूजा असते , महादेव
क्षितिजालाही आमंत्रण करतो.....
तसेही रवि ला भेटण्यास परी उत्सुक
असते , क्षितिजा नटून थटून रविच्या मित्राच्या पूजेला जाते वाटेतच
ती रविला भेटते, खूप खुश होते.....
त्याला पाहून तिच्या मनात काहूर
माजतो पण एक विलक्षण भीती हि तिला जाणवत होती, पण रविला पाहून ती त्याच्याकडे ओढली जात होती
कदाचित रवि चेही हेच,
झाले होते क्षितिजाची सुंदरता व मोहकता पाहून
तो हि त्याच्या मनाला नाही आवरू शकला आणि ते दोघे समुद्रावर,
फिरायला जातात, पाहतच क्षणी ती दोघे एकमेकांचे झालेले होते,
प्रत्येक प्रेमी युगुलांप्रमाणे तेही प्रेमाच्या, बाहुपाशात वचनबद्ध
होतात.....
आज क्षितिजा खूप खूप खुश होती,
तशी रवीची अवस्था पाहण्या जोगी नव्हती रविहि खूप खुश
होता, शेवटी अति रात्र झाल्यामुळे ते आपापल्या घरी निघतात ,
दुसऱ्या दिवशी क्षितिजा रविच्या फोनची आतुरतेने वाट पाहत,
होती आणि रविचा फोन येतो क्षितिजा खूप उत्सुक
होती त्याच्याशी बोलण्यात,
कारण आता त्यांच्या मैत्रीचे रुपांतर
प्रेमात झालेले होते.....
पण ज्यावेळी रविचा फोन
येतो तेव्हा क्षितिजाच्या पायाखालची जमीनच हादरते, रवि परीला म्हणतो ,
 "माझे खूप प्रेम आहे, अगदी जीवापाड प्रेम
करतो मी तुझ्यावर, पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत "
त्याचे तो तिला कारण हि सांगतो त्याच्या मोठ्या भावाचे,
म्हणजेच जितेंद्रचे सोनालि नावाच्या एका मुलीवर खूप प्रेम,
होते त्यांचे प्रेम अगदी लहानपनापासून होते ज्या वेळी जितेंद्र,
त्याच्या आई वडिलांना हि गोष्ट
सांगतो तेव्हा समाजाच्या विचाराने त्याच्या आईला हृदय,
विकाराचा झटका येतो त्यामुळे त्यांचे लग्न नाही झाले,
आणि ह्या मुळे रविहि क्षितिजाशी लग्न नव्हता करणार....
तरीही रवि आणि क्षितिजा एकमेकांना भेटत होती,
फिरायला जाणे चित्रपट पाहणे
हे त्यांचे नेहमीचे झाले होते....
क्षितिजा आणि रविच प्रेम दिवसेंदिवस बहरत होते आणि एके,
दिवशी रविच्या बाबांनी रविचे लग्न ठरवले,
ती मुलगी महादेवच्या गावाची होती महादेव ने हि त्या मुलीला होकार
दिला.....
आता मात्र रवि क्षितिजाला टाळू
लागला होता तो तिच्याशी तुसडेपणाने बोलत होता पण,
त्याचा काही परिणाम क्षितिजावर होत नव्हता, ती रडत असे भांडत,
असे पुन्हा त्याला फोन करून त्याच्याशी बोलत असे......
 लग्न
ठरल्यानंतरही क्षितिजा आणि रवि एकमेकांना भेटत होते, तेच नाते, तेच
प्रेम त्यांच्यामध्ये आजही होते,
जस जशी रविच्या लग्नाची तारीख जवळ येत होती,
तस तसे क्षीतिजाचे
प्रेम फक्त वाढतच चालले होते
क्षितिजाला आता रवि शिवाय राहणे
खूप,कठीण होवून बसले होते आणि एके
दिवशी तिला रविच्या लग्नाची तारीख समजते क्षितिजाला खूप त्रास,होत होता
म्हणून ती कसला हि मागे पुढे विचार न करता
रविला लग्नापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू लागली.....
पण
त्यामुळे ती रविच्या आणखीणच जवळ गेली....
रवि ने लग्न मोडावे
म्हणून ती रविला विनवणी करू लागली पण घरच्या परिस्थितीने,
गांजलेल्या रविच्या हातात काहीच नव्हते , कारण
एका बाजूला त्याचे आई बाबा तर एका बाजूला त्याची क्षितिजा
लग्नाचे दिवस जसे जसे येत होते तस तसे क्षितिजा आजारी पडू,
लागली होती पण तरीही ह्याचा रविवर काही परिणाम होत,नव्हता
आणि शेवटी रविच्या लग्नाचा दिवस उजाडला,
आता मात्र सगळे क्षितिजाच्या आणि रविच्या हाताबाहेर गेलेले होते,
क्षितिजा खूप रडत होती
काय करावे तिला सुचत नव्हते
आणि जे होवू नये तेच घडले
अति रडल्यामुळे आणि अति विचारामुळे
क्षितिजाचा ब्रेन हेमरेज झाला आणि ती गेली.......
पण
शेवटच्या क्षणालाही क्षितिजा रविने तिला सांगितलेल्या,
मन आणि प्रेमाच्याच गोष्टीचाच विचार करत होती ,
कारण
तिला तिच्या प्रेमाने अर्धवट साथ दिली होती...
.
तिच्या मरणाने........
.
रविची अवस्था पाहण्यास किंवा तो खुश आहे कि दु:खी हे
पाहण्यास ती राहिली नाही....
-
तिने रविचा,
तिच्या घरच्यांचा आणि ह्या जगाचा
कायमचाच निरोप,घेतला होता,
कारण गोष्टीतल्या प्रेमाची तुलना
तिने तिच्या रविशी केली
आणि रविचे प्रेम तिला खोटे वाटले....
-
पण,
-
तरीही क्षितिजा शेवटच्या क्षणी सुद्धा
तिचे मरण रविच्या बाहुपाशात व्हावे
असेच वाटत होते,
-
आणि शेवटची ती इच्छाही पूर्ण करण्यास
रवि अपयशी ठरला होता.....
------------:--/-/-/-/-/-/-/-/--:------------
.
गोष्टीतले प्रेम आणी प्रेमाच्या कथा
एक होती क्षितिजा.......
-------------------------------------------
.
.
.
.
.
.
.
.
Tags :-
...........
Ek Hoti Kshitija Ravi Kavya Katha

एक टिप्पणी भेजें

1 टिप्पणियाँ