प्रिय वाचक मित्रांनो आपले आमच्या ब्लॉग वर मनापासून हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो ह्या ब्लॉग वर आम्ही वेगवेगळ्या विषयांवर मराठी मध्ये कथा कविता जोक्स चारोळी तसेच इतर अनेक प्रकारच्या वाचकांनी पाठवलेल्या आर्टिकल्स च्या पोस्ट करत असतो जर आपण ही आमच्या ह्या ब्लॉग वर आपल्या कथा कविता किंवा कोणतेही मराठी साहित्य पोस्ट करू इच्चीत असाल तर आमच्या शी संपर्क करू शकता .
काही निवडक नवीन कविता..
काय ही दूनिया साली
क्वचित हसतो मी
म्हणतात किती रे तू हसतो
कसं सांगावं ह्या लोकांशी
मी तर हरक्षण रडतो
हुंदका येता मला हे
आता हसू नको म्हणतात
कळेना जळत्या निखारयाला
कापूस कसे समजतात
थोडं मिळवलं आता की
गावभंर वाहवा होते
जशी वैनगंगा ही तर
गाव तळ्यातुन येते
दोन ओळी लिहिल्या नाही
कि म्हणे कुसुमाग्रज च होते
सरपंच गावच्या आमच्या
म्हणजे प्रधानमंत्री च होते
पिंटेही आमचं मागे नाही
लहानाच मोठं करते
शिंगणापुरला गेलतं मागे
सिंगापुरच्या बाता मारते
कुमार रवी
मित्रांनो ह्या कविता आपल्याला कशा वाटल्या ते आम्हाला जरूर कळवा . पोस्ट आवडल्यास आमचे फेसबुक पेज लाईक करा .. तसेच आमच्या पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा . धन्यवाद .!
जय हिंद , जय महाराष्ट्र..!

1 टिप्पणियाँ
For reader ..; Agr apke pass site ke bareme koi sujhav ho to bataye.
जवाब देंहटाएं