PRITICHE SHAHAR
प्रीतीचे शहर
मित्रानो ह्या ब्लॉगवर आम्ही नवनवीन मराठी कथा कविता चारोळ्या तसेच जोक्स व इतर माहितीपूर्ण मनोरंजक आर्टिकल्स पोस्ट करत असतो तरी कृपया वाचून झाल्यानंतर आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कळवा .
......खुप जुना आहे नाता
......अनेक वर्षे झाली आता
दिसतील जरी फक्त अवशेष दगडी वीटा
तरी कधी प्रीतिचा माझ्या गाव इथेच होता
.
इथल्या मातीशी , इथल्या रानाशी
खुप जुनी ओळख आहे इथल्या कऴ्या फुलांशी
आता खुप विराण वाटतात गर्दी असुनही
कधी होत्या ज्या प्रीतीने शृंगारलेल्या वाटा
.
इथे चन्द्र रात किडयांची सुर मैफिल गाजवते
पण एक खास लावण्या चंद्रालाही लाजवते
ते लावण्य स्वप्नात भेटायचे कधी आता दिसत नाही
शहरात रमलो म्हणून का तुटला प्रीतिचा नाता
.
माझ्या मनातले भाव अजुन तसेच आहेत
मुखवटे बदलले जीवनाचे संस्कार जुनेच आहेत
त्या सुंदर स्मृति तुझ्या सोबतीच्या
मनपटलावर कोरल्या तशाच आहेत
.
माहितीये कधी पूर्ण होणार नाहीत
माझी क्षितिजा ची प्रीत स्वप्ने
पण तुझ्या आठवणी चैन देत नाहीत
कठिन आहे तुला रहद्यात ठेवून जगणे
.
पण काय करू भावना अजूनही जिवंत आहेत
ह्यांना किती अजुन कुस्कारु पुन्हा पालव्या फुटत आहेत
.
काय करू तुला सांगायचं राहिलंय
माझ्या स्म्रुतित फक्त एक तुझेच स्वप्न पाहिलंय
तुला ते तिन शब्द सांगायच राहिलंय
माझं तुला आणी तुझं मला
..........कबूल करायचं राहिलंय
.
बस आता शब्द स्फुटत नाहीयेत गं
इतकच बाकि होतं
इतकच सांगनं राहिलं होत जाता जाता
.
कुमार रवि रवि काव्य क्षितिजा kMr RAVI
मित्रानो ही पोस्ट आपल्याला कशी वाटली ते आम्हाला सांगा आणी आमच्या नवनवीन पोस्ट मिळवत राहण्यासाठी आम्हाला शोशल मीडियावर फॉलो करा .
